कोर्लई,ता.९(राजीव नेवासेकर) मुरुडच्या सर एस.ए.हायस्कूलमध्ये रायगड गणित विज्ञान अध्यापक मंडळाची गणित संबोध परीक्षा २०२४-२५ तालुका मुरुडचा पारितोषिक वितरण सोहळा रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी ललिता दहितुले मान्यवरांच्या हस्ते तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
रायगड जिल्हा परिषदेचे शेडगे, मुख्याध्यापक सरोज राणे, नांदगाव श्रीछत्रपती शिवाजी नूतन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अर्चना खोत, केंद्र प्रमुख कवळे, पाटील, तालुका पंचायत समितीचे प्रवीण भगत,गणित संबोध परीक्षा अध्यक्षा मीना मोरे,गणित मंडळ तालुका अध्यक्ष संदेश चोरघे,विज्ञान मंडळ तालुका अध्यक्ष सुरेश मोरे उपस्थित होते.
सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन दिपप्रज्वलन करुन श्री सरस्वती पुजनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी शिक्षणाधिकारी ललिता दहितूले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करुन गणित शिक्षणाच्या महत्त्वावर विचार मांडले.प्रास्ताविक गणित मंडळ तालुका अध्यक्ष संदेश चोरघे यांनी केले.
या परीक्षेत ५०७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता,त्यात २७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले,विद्यार्थी जिल्हा शिष्यवृत्ती: ८ विद्यार्थी,उत्तेजनार्थ बक्षीस: ८ विद्यार्थी प्रमाणपत्र,डायनॅमिक स्कूल अँड टीचर अवॉर्ड,उपक्रमशील शाळा बक्षीस: विजेती शाळा - छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय नांदगाव (१७९ विद्यार्थी)ठरली.कार्यक्रमाला तालुक्यातील शाळांचे मार्गदर्शक शिक्षक, पालक आणि एकूण १२५ विद्यार्थी उपस्थित होते.सुत्रसंचलन दिपाली रोटकर यांनी केले तर मीना मोरे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या