-
कोर्लई,ता.३०(राजीव नेवासेकर)जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूकीत मुरुड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन जागांसाठी ५ उमेदवार तर पंचायत समितीच्या चार जागांसाठी १३ उमेदवार रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव सोनावणे यांनी दिली.
जिल्हा परिषदेकरीता व पंचायत समितीसाठी उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात राहिलेले उमेदवार रायगड जिल्हा परिषदेच्या ३८ राजपुरी गटातुन जिल्हा परिषद सदस्य पदाकरीता अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित बाळकृष्ण कासार तर शिंदे शिवसेना पक्षांकडून - विघ्नेश विजय माळी हे उमेदवार असुन सरळ लढत होणार आहे.
रायगड जिल्हा परिषद ३७ कोर्लई गटातुन जिल्हा परिषद सदस्य पदाकरीता शिंदे शिवसेना पक्षांकडून - ज्योती रमेश नागावकर, उद्धवसेना पक्षांकडून- राजश्री प्रशांत मिसाळ, भाजप पक्षांकडून ॲड. मनस्वी महेश मोहीते उमेदवार असुन या ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे.
मुरुड पंचायत समितीच्या ७३ बोर्ली गणातील पंचायत समिती पदाकरीता शिंदे शिवसेना पक्षांकडून उमेदवार- निलेश शांताराम घाटवळ, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार संजय हरिश्चंद्र महाडीक, शेकाप पक्षाकडून वामन केशव चुनेकर तर अपक्ष उमेदवार अंकिता अरविंद पोवळे हे उमेदवार असुन या ठिकाणी चौरंगी लढत आहे.
मुरुड पंचायत समितीच्या ७४ कोर्लई गणातुन पंचायत समिती सदस्य पदाकरीता शिंदे शिवसेना पक्षांकडून स्वाती आशिष चवरकर भाजप पक्षांकडून अश्विनी जयवंत डोंगरीकर उद्भवसेना पक्षांकडून सिध्दी शरद पाटील या उमेदवार असुन या ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. मुरुड पंचायत समितीच्या ७५ नांदगाव गणातुन पंचायत समिती सदस्य पदाकरीता भाजप पक्षांकडून उमेदवार रमेश हरी दिवेकर,शिंदे शिवसेना पक्षांकडून उमेदवार गणेश प्रभाकर नाक्ती भारतीय काँग्रेस पक्षाकडून अस्लम हुसेन हलडे,शेकाप पक्षाकडून निता विजय गिदी या उमेदवार असुन या ठिकाणी चौरंगी लढत होणार आहे.
मुरुड पंचायत समितीच्या ७६ राजपुरी गणातून पंचायत समिती सदस्य पदाकरीता शिंदे शिवसेना पक्षांकडून अश्विनी संजय जंगम, शेकाप पक्षाकडून उमेदवार - सुनिता कृष्णा वाचमारे हे उमेदवार असुन या ठिकाणी दुरंगी लढत होणार आहे या निवडणुकीकरिता सर्व पक्षाच्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव सोनावणे यांनी तहसीलदार कार्यालयातील तहसीलदार दालनात उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले आहे. शिंदे शिवसेना पक्षांला धनुष्यबाण, भाजप पक्षाला कमळ, उद्भवसेना पक्षाला मशाल, शेकाप पक्षाला खटारा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला हात तर अपक्ष यांना गॅस सिलेंडर हे चिन्ह वाटप करण्यात आले आहे. निवडणूकीकरिता ७ फेब्रुवारी २०२६ मतदान होणार असून ९ फेब्रुवारीला मतमोजणी होणार असल्याचे समजते.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या