कोर्लई,ता.14(राजीव नेवासेकर)मुरुड पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक २०२५ करिता सभापती पदाचे आरक्षण सर्वसाधारण म्हणून जाहीर झाल्यानंतर आज बोर्ली ,राजपुरी,कोर्लई, नांदगाव, या ४ गणांची जागेची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांच्या आदेशान्वये आरक्षण सोडत मुरुड पंचायत समिती महाराष्ट्र भुषण आ.डाॅ.ति.श्री नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात मुरुड तहसीलदार-उपविभागीय अधिकारी मुरूड - दुर्गा देवरे व
आदेश डफळ यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण प्रक्रिया आज पार पडली.
तहसीलदार -आदेश डफळ यांनी प्रथम तालुक्यातील आलेल्या सर्व पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे स्वागत करुन आरक्षणला सुरुवात करण्यात आली.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेश व निर्देश नुसार ७६ राजपुरी गण अनु जमाती महिला राखीव ठेवण्यात आली.
निर्वाचक नांदगाव ७५ गण ,निर्वाचक गण ७३ बोर्ली , निर्वाचक कोर्लई ७४ गणासाठी चिठ्या बनवुन प्लास्टिक च्या बरणीत सर्वांच्या देखेत टाकण्यात आल्या.त्यामधील शिक्षण मंडळ नगरपरिषद ४ मधील विद्यार्थी हुजेफा शेख या ९ वर्षे च्या मुलानी भरणी मधुन १ चिठ्ठी उचलण्यात आली त्या चिठ्ठी मध्ये कोर्लेई ७४ गणासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या नावाची चिठ्ठी काढण्यात आली. उरलेल्या दोन चिठ्ठ्या सर्व साधारण ,७५ नांदगाव गण व बोर्ली ७३ गण सर्वसाधारण खुला आरक्षण आले.
आरक्षण सोडते वेळी उपविभागीय अधिकारी मुरूड - दुर्गा देवरे ,मुरुड तहसीलदार -आदेश डफळ, निवासी नायब तहसीलदार -संजय तवर, नायब तहसीलदार- राजेश्री साळवी निवडणूक नायब तहसीलदार-कल्याण देऊळगावकर,गटविकास अधिकारी - राजेंद्रकुमार खताळ ,महसुल सहायक- प्रतिक पावसकर, सहाय्यक गटविकास अधिकारी - मंगेश पाटील,
राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मनोज कमाने ,ऋषिकांत डोंगरीकर,नौशाद शाबान,संदिप गोणबरे शैलेश काते,विजय गिदी,मंदा ठाकुर,आदेश भोईर,शाम कोतवाल,बाबु नागावकर, चंद्रकांत कमाने,चरण पाटील, आदिंसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या