Type Here to Get Search Results !

मुरुडच्या अंजुमन इस्लाम जंजिरा महाविद्यालयात नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत

कोर्लई,ता.२६(राजीव नेवासेकर) मुरुडच्या अ़ंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स मुरुड जंजिरा महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत वरिष्ठ विद्यार्थ्यांमार्फत करण्यात आले. 

       या कार्यक्रमाची सुरुवात कुरआन पठणाने करून स्वागत समारंभाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. साजिद शेख यांनी भूषविले. त्यांनी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक स्वागत करून विद्यार्थ्यांनाअभ्यासक्रमातील नवीन संधींचे स्वागत करण्याचे व शिक्षणात गुणवत्ता आणि शिस्तीचे महत्त्व पटवून दिले तसेच महाविद्यालयात रॅगिंग याला कायद्याने मनाई आहे आणि दोषी आढळल्यास शिक्षा होऊ शकते हा संदेश सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आला.वरिष्ठ विद्यार्थ्यांमार्फत या विद्यार्थ्यांना विविध मनोरंजन, महाविद्यालयाचे वैशिठ्ये सांगून व विविध मनोरंजनात्मक स्पर्धांसह त्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी देखील नवीन वर्षासाठी नवीन ऊर्जा आणि उद्दिष्टांसह महाविद्यालयीन जीवनाची सुरुवात केल्याचा आनंद व्यक्त केला.

       महाविद्यालयातील विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यमान विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा.बिस्माह किल्लेदार यांच्यासह वरिष्ठ विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि अभारप्रदर्शन ह्फशा उलडे आणि सानीया मळेकर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर