Type Here to Get Search Results !

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत ड्रोन व सीसीटीव्ही दुरुस्ती प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न


रायगड, जिमाका दि. २४:जिल्हा उद्योग केंद्र, रायगड-अलिबाग व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ड्रोन आधारित प्रणाली व सीसीटीव्ही कॅमेरा देखभाल आणि दुरुस्ती प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ आज  जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा उद्योग केंद्र, रायगड-अलिबाग येथे संपन्न झाला.कार्यक्रमाला  जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया,विजयकुमार कुलकर्णी,महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जी.एस. हरळय्या, व्यवस्थापक, बँक ऑफ बडोदा चैतन्य मुड,जिल्हा समन्वयक, स्टेट बँक ऑफ इंडिया संजय गोळे  उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. जावळे यांनी यावेळी बोलताना सांगितले की,  जिल्ह्यातील कृषी व्यवसायासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर  औषध फवारणी यासारख्या उपक्रमांद्वारे  वाढविण्यात येणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांचा मेळावा घेऊन त्यांना द्रोणच्या माध्यमातून औषध फवारणीचे फायदे समजाऊन भविष्यात त्याचा उपयोग करून आंबा पिकाचे उत्पन्न वाढ होईल यावर भर दिला जाईल.सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात ठीक ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.आपला जिल्हा निसर्गरम्य असल्यामुळे पर्यटनाला चालना देणारा आहे त्यामुळे लाखो पर्यटक जिल्ह्यात येत असतात.त्यांना सुंदर आणि सुरक्षित समुद्र किनारे मिळाले तर पर्यटनास आणखी चालना मिळेल यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे दुरुस्ती प्रशिक्षणाच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.तसेच ड्रोन आणि सीसीटीव्ही क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उद्योग संधी असून, जिल्हा प्रशासन या क्षेत्रांतील प्रशिक्षण व प्रोत्साहन यावर भर देत आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविकात बोलताना  जी.एस. हरळय्या यांनी सांगितले की, रायगडसारख्या पर्यटन जिल्ह्यात ड्रोन आधारित उद्योग व्यवसायासाठी भरपूर संधी आहेत. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठीही भरपूर रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. या प्रशिक्षणामुळे बेरोजगार तरुणांना स्वउद्योग सुरू करण्यास मदत होईल.

यावेळी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या फूड व्हॅन वाहनांचे हस्तांतरणही जिल्हाधिकारी श्री. किशन जावळे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर