अटकावून ठेवलेल्या जप्त वाहनांचा ई-लिलाव इच्छुकांनी ई-लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घ्याव
रायगड(जिमाका) दि.05:- मोटार वाहन कर न भरलेल्या वाहनांना मुंबई मोटार वाहन कर अधिनियमांतर्गत जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या वाहनांच्या वाहन मालकांना थकीत कर भरणा कळविण्यात आल्यानंतर देखील वाहन मालकांनी कर भरलेला नाही. अशा एकूण 44 वाहनांचा ई-लिलाव दि.7 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11.00 ते सायंकाळी 4.00 यावेळेत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल येथे होणार असून सर्व इच्छुकांनी ई-लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा, असे आवाहन कराधान प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल जयंत चव्हाण यांनी केले आहे.
ई लिलावाच्या तारखेपर्यंत थकीतदारांना कर भरण्याची संधी राहील, याची वाहनाच्या मालकांनी, ताबेदारांना, वित्तदात्यांनी लिलावाचा दिनांकापर्यंत या कार्यालयात थकीत कर, पर्यावरण कर शासकीय दंडाच्या रकमेचा भरणा करून वाहने सोडून द्यावीत किंवा लिलावात हरकत घ्यायची असल्यास दि.19 मार्च 2025 पर्यंत लेखी हरकत घ्यावी. तद्नंतर आपले काही म्हणणे नाही असे गृहीत धरून वाहनांचा लिलाव हा ई-लिलाव पदध्दतीने करण्यात येईल. ई-लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी कार्यालयाच्या सूचना फलकांवर माहितीसाठी लावण्यात आली आहे. इच्छुकांनी वाहनांची प्रत्यक्ष पाहणी दि.24 मार्च 2025 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 पर्यंत वाहन अटकावून, जप्त असलेल्या ठिकाणी संपर्क करावा. अधिक माहितीसाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल येथे संपर्क साधावा.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या