300 खाटांच्या नवीन आंतररुग्ण इमारतीचे उद्या भूमिपूज
रायगड(जिमाका) दि.4:- अलिबाग येथील जिल्हा रुग्णालय,रायगड च्या 300 खाटांच्या नवीन आंतररुग्ण इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन बुधवार दि.05 मार्च रोजी सायंकाळी 4.00 वा.सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते तर महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे तसेच रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
यावेळी खासदार धैर्यशील पाटील, श्रीरंग बारणे, सुनिल तटकरे आणि आमदार सर्वश्री ज्ञानेश्वर म्हात्रे, विक्रांत पाटील, निरंजन डावखरे, रविंद्र पाटील, प्रशांत ठाकूर, महेंद्र थोरवे, महेश बालदी आणि महेंद्र दळवी आदी मान्यवर उपस्थित उपस्थित राहणार आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या