Type Here to Get Search Results !

KISAN JAVALEलोकशाही दिनामध्ये अर्जदाराने वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारींचे निराकरण --जिल्हाधिकारी किशन जावळे

 लोकशाही दिनामध्ये अर्जदाराने वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारींचे निराकरण --जिल्हाधिकारी किशन जावळे

रायगड,(जिमाका)दि.10:- लोकशाही दिनामध्ये अर्जदाराने आपल्या वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारींचे निराकरण करण्याकामी अर्ज विहित नमुन्यात 15 दिवस आधी 2 प्रतींत पाठविणे आवश्यक असून अर्जदार यांनी प्रथम तालुकास्तरावर तहसिलदार यांच्याकडे अर्ज करावा. तालुकास्तरीय लोकशाही दिनात 30 दिवसांत कार्यवाही न झाल्यास जिल्हास्तरावर अर्ज करता येईल असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी कळविले आहे.

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन तर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. तसेच जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यांनतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर