Type Here to Get Search Results !

मुरुड तालुका सेवानिवृत्त संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

कोर्लई,ता.२९(राजीव नेवासेकर) मुरुड तालुका सेवानिवृत्त संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा संघटनेचे जिल्हाध्यक्ष धुरंधर मढवी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. 

     सुरुवातीला वसंतराव नाईक महाविद्यालयाचे माजी प्राचार्य विश्वास चव्हाण,माजी‌ कार्यवाह मनोहर दिघे,कार्यकारणी सदस्य रविंद्र जंजिरकर , बाळकृष्ण कासार, रमेश कवळे यांच्याहस्ते उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन जिल्हाध्यक्ष धुरंधर मढवी, जिल्हा सरचिटणीस रविंद्र पाटील, कोषाध्यक्ष सुरेंद्र जाधव, मुरुड तालुका अध्यक्ष नयन कर्णिक या मान्यवरांच्या हस्ते श्री गणेश पूजन,सावतामाळी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून,अभिवादन करून दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.नुकतेच निधन झालेल्या सदस्यांना दोन मिनिटे स्तब्धता पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

    मुरुड जंजिरा तालुका सेवा निवृत्त संघटनेचे अध्यक्ष नयन कर्णिक यांनी आपल्या प्रास्ताविकात सेवानिवृत्त संघटना का असावी, संघटनेचा उद्देश व अधिकाधिक  सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी या संघटनेत सामील व्हावे. असे आवाहन करण्यात आले.

    कार्यक्रमाचे‌ औचित्य साधून सेवानिवृत्त संघटना शाखा मुरूड तर्फे धुरंधर मढवी जिल्हाध्यक्ष यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीफळ,शाल, पुष्पगुच्छ व पद्मदुर्ग किल्ल्याची फोटो फ्रेम देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येऊन छायाचित्रकार,पत्रकार गणेश चोडणेकर यांना उत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीफळ,शाल,च पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कोषाध्यक्ष गजानन पाठक यांनी  सन २०२३-२४  जमाखर्चाचे वाचन करून मंजुरी घेण्यात आली.मनोगतात डाॅ.कोकाटे यांनी सेवानिवृत्त धारकांनी आपला पैसा आपल्यासाठी खर्च करावा,प्रामाणिकपणे काम करावे तसेच आपले आरोग्य कसे सुखकर होईल याबाबत मार्गदर्शन केले.सरचिटणीस राजेंद्र पाटील, कोषाध्यक्ष सुरेंद्र जाधव , सदस्य तथा पत्रकार मेघराज जाधव सर यांनी ही संघटना कशी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे संघटनेमार्फत सदस्यांच्या समस्या ही सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे सांगितले. यावेळी सदस्यांनी आपापल्या समस्या मांडल्या समस्यांचे निरसन जिल्हाध्यक्ष धुरंधर मढवी यांनी योग्यप्रकारे केले.अध्यक्षीय भाषणात धुरंधर मढवी यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वैद्यकीय भत्ता मिळणे केंद्राप्रमाणे महागाई,८व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनवाढ मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहोत असे निर्देशनास आणून वेतनवाढ कशी होते.याबाबत मार्गदर्शन केले.

 संघटनेचे सचिव उल्हास भगत,सहसचिव अनघा चौलकर,कार्यकारणी सदस्य मंगेश मोहिते,विलास जगताप,सुगंधा दळवी, नैनिता कर्णिक, रमेश कवळे,प्रभाकर भोईर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.सूत्रसंचालन उषा खोत यांनी तर उपाध्यक्ष शकील कडू यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर