सर्वांना सोबत घेऊन रेवदंडा बीच महोत्सव साजरा करण्यात यावा : प्रमोद उर्फ बाळू नवखारकर
कोर्लई,ता.१६(राजीव नेवासेकर) दरवर्षी डिसेंबर अखेरीस थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर, नववर्षाच्या सुरुवातीला कोकणातील बहुतांश ठिकाणी पर्यटन महोत्सव विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात येतात, रायगड जिल्ह्यातील रोहा, अलिबाग -मुरुड समुद्रकिनारी पर्यटक हौशी, नागरिकांची रेलचेल असते.याच पार्श्वभूमीवर अलिबाग तालुक्यातील संतांची भूमी प्रसिद्ध असलेल्या रेवदंडा येथील समुद्रकिनारी सर्वांना सोबत घेऊन "रेवदंडा बीच महोत्सव"धुमधडाक्यात सुरु करण्यात यावा.अशी भावना स्थानिक कार्यकर्ते प्रमोद उर्फ बाळू नवखारकर यांनी व्यक्त केली आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी अलिबाग,नागाव, मुरुड तालुक्यातील काशिद बीच, मुरुड जंजिरा ठिकाणी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांची पर्वणीच असते.पर्यटनात रेवदंडा येथे अथांग लाभलेला आकर्षक व स्वच्छ-सुंदर समुद्रकिनारा, शुभ्र वाळू तसेच विविध धार्मिक स्थळे पर्यटकांना आकर्षित करत असतात, दरवर्षी जिल्ह्यातील रोहा अलिबाग -मुरुड ठिकाणी विविध मनोरंजनात्मक बीच महोत्सव साजरा करण्यात येत असतो.याच पार्श्वभूमीवर रेवदंडा येथील समुद्रकिनारी सर्वांना सोबत घेऊन रेवदंडा बीच महोत्सव साजरा करण्यात यावा.यामुळे समुद्रकिना-यावर स्थानिक व्यवसाय,उद्योगांना चालना मिळून त्यावर अवलंबून रोजगाराचा प्रश्न सुटू शकेल.यासाठी सर्वांना सोबत घेऊन रेवदंडा बीच महोत्सव साजरा करण्यात यावा.अशी प्रतिक्रिया बाळू नवखारकर यांनी व्यक्त केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या