आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या माध्यमातून मुरुडच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार : दिनेश मिणमिणे
कोर्लई,ता.१०(राजीव नेवासेकर) नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळून राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून महायुतीतील शिवसेनेचे अलिबाग -मुरुड मतदार संघाचे दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या माध्यमातून मुरुडच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार महेंद्रशेठ दळवी यांचे खंदे समर्थक तथा शिवसेनेचे जिल्हा संघटक दिनेश मिणमिणे यांनी व्यक्त केली आहे.
केंद्रात आपले सरकार असून राज्यात महायुतीचे सरकार येण्यासाठी जनतेने उत्तम प्रतिसाद दिला तसेच आगामी काळात होणाऱ्या स्वायत्त संस्थांच्या ELECTION निवडणुकीतही असाच प्रतिसाद मिळावा,एक हाती सत्ता आल्यास मतदार संघाचा नक्कीच शंभर टक्के विकास होऊन कायापालट होईल.असे सांगून मागील पाच वर्षांच्या कालावधीत आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी मुरुडच्या विकासासाठी ध्यास घेऊन अनेकविध विकास कामे पूर्ण केली आहेत.भविष्यात आगामी काळात पद्मदुर्ग किल्ला सुशोभीकरण,शहर सुशोभीकरण व पर्यटकांसाठी खुला करणे,हद्द वाढ, सुसज्ज क्रीडा संकुल,, मच्छीमारांसाठी कोल्ड स्टोअरेज, DIGHI PORT प्रकल्पात स्थानिकांना रोजगार,एस.टी.डेपो सुशोभीकरण,MAJGAON मध्ये सुसज्ज हॉस्पिटल,खार आंबोली धरण परिसरात शेतीसाठी कालवे, आनंद दिघे स्मारक, सुसज्ज अशा पोलिस वसाहत इमारत आदी.विविध विकास कामे होण्यासाठी आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे
दिनेश मिणमिणे यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या