विभागीय युवा महोत्सवाकरीता रायगड जिल्हयाचा संघ जाहीर
रायगड जिमाका दि.06:युवकाचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परपरा जतन करणे, युवकाच्या अगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन शासनाच्या वतीने करण्यात येते. राज्यात सन २०२४-२५ या वर्षातील युवा महोत्सवाचे आयोजन कीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड, नेहरु युवा केंद्र व विविध प्रशिक्षण संख्या यांचे संयुक्त विद्यमाने दि.०४/१२/२०२४ रोजी पी. एन. पी. महाविदयालय, वेश्वी, अलिबाग, रायगड या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.या महोत्सवामध्ये ९ बाबीमध्ये रायगड जिल्हयातील एकुण ८० युवक युवतींनी सहभाग नोंदविला. विजेत्यांना सन्मानविन्ह व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. विभागीय युवा महोत्सवाकरीता जाहीर झालेले संघ पुढीलप्रमाणे-
१.) बाब, प्राविण्य व स्पर्धकाचे नाव-सकल्पना आधारीत स्पर्धा- विज्ञान व तंत्रज्ञान यामधिल प्रथम नवसंकल्पना" "NNOVATION IN SCIENCE AND TECHNOLOGY-प्रथम प्राविण्य,
को. ए. सो. ना. ना. पाटील हायस्कुल, पोयनाड, अलिबाग, रायगड- १. फयाज शादुल शेख २. यश सचिन पाटील
२.) कौशल्य विकास- कथा लेखन- प्रथम-दिपाली दिपके, अलिबाग, द्वितीय-हर्षाली नागावकर, बोली मांडला
तृतीय-प्रतिक देवळेकर, महाड
कविता-प्रथम प्राविण्य- आकाश आलदर, कळंबोली, वक्तृत्व- प्रथम निशा जांगिड, पनवेल, द्वितीय अश्विन शिंदे, अलिबाग
तृतीय-अक्सा इद्रुस, पनवेल
चित्रकला-प्रथम- जिज्ञासा थळे, अलिबाग, द्वितीय-अनया पाटील, अलिबाग,तृतीय-सायली मुवड, अलिबाग
३.)सांस्कृतिक-१.) लोकनृत्य-प्रथम प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग, द्वितीय-स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्था, रोहा
तृतीय-स्पर्धा विश्व अॅकॅडमी, अलिबाग
२.) लोकगीत-प्रथम-प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग,द्वितीय-रोहयाचे लोककलाकार, रोहा
तृतीय-स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्था, रोहा,राजेंद्र अंतनुर,
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या