कोर्लई,ता.१६(राजीव नेवासेकर) अहमदाबाद गुजरातच्या महाराष्ट्र समाज मंडळ आणि पलपब प्रकाशन यांच्या संयुक्तविद्यमाने देण्यात येणारा महाराजा सयाजीराव गायकवाड समाजभूषण पुरस्कार -२०२४ मुरुड येथील ज्येष्ठ समाजसेवक अनिल पुलेकर यांना देण्यात आल्याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
अहमदाबाद गुजरातच्या महाराष्ट्र समाज मंडळ आणि पलपब प्रकाशन यांच्या संयुक्तविद्यमाने सामाजिक कार्यात योगदान दिलेल्या व्यक्तींना गौरविण्यासाठी दिला जाणारा हा मानाचा पुरस्कार शानदार समारंभात मान्यवरांच्या हस्ते अनिल पुलेकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात येऊन त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.यावेळी नामवंत जेष्ठ लेखक, समाजप्रबोधक गणपतराव कणसे आणि पलपबच्या सौं लीना पाटील यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक देण्यात आले.
या समारंभात बोलताना पुलेकर यांनी उपस्थितांना समाजसेवेचे महत्त्व पटवून दिले आणि युवापिढीला समाजाभिमुख कार्य करण्यासाठी प्रेरित केले.
ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील आदिवासी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्यांसाठी अनिल पुलेकर यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.समारंभास महाराष्ट्र आणि गुजरात मधून आलेले साहित्य क्षेत्रातील मान्यवर, समाजसेवक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या