रायगड (जिमाका) दि.05 :-भारत निवडणूक आयोगाने दि.15 ऑक्टोबर, 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमानुसार रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघामध्ये बुधवार, दि.20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. सर्वाना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी बुधवार दि.20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरणार आहे, अशा सर्व ठिकाणी बाजार व जत्रा पूर्णवेळ बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रायगड किशन जावळे जारी केला आहे.
अधिनियम, 1862 चे कलम 5 (ग) मधील तरतुदीनुसार या विधानसभा मतदार संघांच्या मतदार यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे, मतदाराला आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदान सुरळीतपणे पार पडणे याकरिता बुधवार दि.20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरणार आहे, अशा सर्व ठिकाणी बाजार व जत्रा पूर्णवेळ बंद राहणार आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या