अलिबाग पी.एन.पी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे संविधान दिन साजरा.
कोर्लई,ता.२६(राजीव नेवासेकर)अलिबाग येथील प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील इतिहास विभाग,राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंगळवार दि.२६ नोव्हेंबर रोजी "संविधान दिन" साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज मुरुड, जि.रायगड येथे कार्यरत असलेले प्र. प्राचार्य डॉ. साजिद शेख हे प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.मिलिंद घाडगे यांनी सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यामध्ये भारतीय संविधानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची महत्वपूर्ण भूमिका स्पष्ट केलीमहाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी कु. हिमानी कदम आणि कु.हर्षाली नागावकर यांनी भारतीय संविधानावर अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले डॉ. साजिद शेख यांनी भारतीय संविधानावर विवेचन करत असताना भारतीय संविधानाने दिलेले अधिकार हे किती महत्त्वाचे आहेत यावर विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग आणि वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. रसिका म्हात्रे, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. पूजा म्हात्रे, भूगोल विभाग प्रमुख प्रा.दिनेश पाटील,QAC विभाग प्रमुख प्रा. केतकी पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. मिलिंद घाडगे, प्रा. कैलास सिंग राजपूत, प्रा. पूजा पाटील, सांस्कृतिक विभागातील प्रा.रूपाली पाटील,प्रा.पायल देऊळकर, प्रा.योगिता पाटील तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रसिका म्हात्रे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. मिलिंद घाडगे यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या