कोर्लई,ता.२५ (राजीव नेवासेकर)मुरुड डोंगरी येथील चढावात पर्यटकांची कार पलटी झाली सुदैवाने पर्यटक सुखरूप असल्याचे समजते. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी मुंबई येथून आलेल्या पर्यटकांची कार डोंगरी चढावात आली असताना अरुंद रस्ते व सुरक्षा भिंत नसल्याने रस्त्याच्या कडेला जाऊन दहा फूट खाली कोसळली व पलटी झाली. या कारमध्ये असलेले पर्यटक किरकोळ जखमी झाले आहेत.
तरी संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर या डोंगरी चढावात सुरक्षा भिंत बांधावी व रस्त्याचे लवकरात लवकर रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी जनमानसातुन जोर धरू लागली आहे. जेणेकरून पर्यटकांच्या गाड्यांना अपघात होणार नाहीत.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या