कोर्लई,ता.८(राजीव नेवासेकर)मुरुड जंजिऱ्याचे श्रद्धा स्थान असलेली ग्रामदेवता श्रीकोटेश्वरी देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्याचाच भाग शारदा महिला मंडळाच्या महिलांनी सुश्राव्य बहारदार भजनाचा कार्यक्रम सादर केला.
यावेळी प्रथम मंडळाच्या अध्यक्षा मनाली मानकर,उपाध्यक्षा सारिका भायदे, वैशाली खोत, रुपाली लोटणकर, टीना पटेल यांच्या हस्ते कोटेश्वरी मातेचे पूजन करण्यात आले.
या नंतर नंदा खोत,विमल पटेल,सुलभा मानकर,विनिता भायदे ,दीपा पुलेकर, मानसी पानवलकर,शिल्पा पानवलकर, दिपाली अपराध, मेघा घरत, सौम्या मानकर यांनी सुश्राव्य बहारदार भजनाचा भजनाचा कार्यक्रम सादर केला, त्यांना दिलीप भायदे यांनी तबल्याची साथ दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोटेश्वरी देवस्थान ट्रस्टचे मोलाचे सहकार्य लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या