कोर्लई,ता.२०(राजीव नेवासेकर) आगामी होणा-या विधानसभा निवडणुकीत अलिबाग -मुरुड मतदार संघात महाविकास आघाडीने अद्याप उमेदवार निश्चित न केल्याने कार्यकर्त्यांत संभ्रम असून पक्षश्रेष्ठींनी या मतदारसंघात लवकरात लवकर उमेदवार निश्चित करण्यात यावा.अशी प्रतिक्रिया शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुरुड तालुका संघटक कुणाल सतविडकर यांनी व्यक्त केली आहे.
आगामी होणा-या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख जवळ येत असून या मतदारसंघात महाविकास आघाडीने अद्याप उमेदवार निश्चित न केल्याने कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला असून पक्षश्रेष्ठींनी मतदारसंघात लवकरात लवकर उमेदवार निश्चित करण्यात आल्यास पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागतील व उमेदवारालाही मतदारांपर्यंत वेळेत पोहोचता येईल. असे कुणाल सतविडकर यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या