Type Here to Get Search Results !

अलिबाग विधानसभा मतदार संघ निवडणूक सर्वसाधारण निरीक्षक रुही खान यांनी घेतला आढावा


रायगड जिमाका दि.३१--  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 सुरळीत पार पाडणेकामी मा. भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरिक्षक यांची नेमणूक केली जाते. 192 अलिबाग विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक निरिक्षक सर्व साधारण म्हणून श्रीम. रुही खान (2013 IAS बॅच) यांची नियुक्ती  करण्यात आलेली आहे.

 निवडणूक निरिक्षक यांनी 192 अलिबाग विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या उमेवारी अर्ज छाननीकामी उपस्थित राहून प्रक्रियेचे निरीक्षण केले. सदर प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर निवडणूक निरिक्षक यांनी 192 अलिबाग विधानसभा मतदार संघामध्ये आदर्श आचार संहिता अंमलबजावणी करीता नगर परिषद, अलिबाग येथील इमारतीमध्ये स्थापित करण्यात आलेल्या निवडणूक नियंत्रण कक्षास भेट दिली व तेथील कामकाजाचा आढावा घेतला.

192 अलिबाग विधानसभा मतदार संघातील मतदान यंत्र ठेवण्यासाठी (Strong Room) निश्चित करण्यात आलेल्या जिल्हा क्रिडा संकुल, नेहूली, अलिबाग या ठिकाण भेट दिली. सदर ठिकाणी करण्यात आलेल्या सुरक्षा यंत्रणा तसेच नियोजनाची पाहणी करुन मा. निवडणूक निरिक्षक त्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.

192 अलिबाग विधानसभा मतदार संघातील मतमोजणी प्रक्रिया दिनांक 23 ऑक्टोंबर  2024 रोजी पार पाडण्याकरीता जिल्हा क्रिडा संकुल, नेहूली, अलिबाग हे ठिकाण निश्चित करण्यात आलेले आहे. मा. निवडणूक निरिक्षक यांनी सदर ठिकाणी भेट देऊन मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडणेकामी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती घेऊन, आवश्यक त्या सुचना दिल्या.

उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण व आचारसंहितेचे उल्लंघन रोखण्याकरीता माननीय निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे खर्च नियंत्रण पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच जनसामान्यांना याबद्दल तक्रारी करता याव्या म्हणून सी-व्हिजील सिटीझन अॅप कार्यरत आहे. हे सी-व्हीजील सीटीझन अॅप आपणास प्लेस्टोअर वर उपलब्ध आहे.

अलिबाग मतदार संघामध्ये एकूण १४ भरारी पथके, ४ स्थिर सर्वेक्षण पथक केंद्र १ आचारसंहीता पथक कार्यरत आहेत. सदर पथकांच्या माध्यमातून उमेदवारांच्या खर्चावर, आचारसंहीता उल्लंघन, बेकायदेशीर कामकाज यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. आचारसंहिता उल्लंघन चौकशी करणे करता आचारसंहिता पथके कार्यरत आहेत. जनसामान्यांना तक्रार करता यावी, याकरीता 24‍ तास नियंत्रण कक्ष उपलब्ध करून देण्यात आले आहे. या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०२४१२२२०४२ असा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर