Type Here to Get Search Results !

सर्पमित्र महेश साळुंखे यांनी दिले ५ फुटी नागाला जिवदान

कोर्लई,ता.२० (राजीव नेवासेकर)मुरुड तालुक्यातील एकदरा गावात जाळ्यात अडकलेल्या ५ फुटी नागाला सर्पमित्र महेश साळुंखे यांनी सुखरूप सोडवून जिवदान दिल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी वनविभागाचे वनरक्षक मिलिंद धुरी, व त्यांचे सहकारी दिनेश रोटकर उपस्थित होते. या नागाला वनखात्याच्या सहकार्याने जवळील जंगलात सोडून दिले.

        एकदरा गावातील मंगेश पाटील यांच्या घराच्या मागील कंपाऊंड ला असलेल्या जाळ्यात हा नाग रात्र भर अडकून पडला होता. सकाळी हे निदर्शनास आल्यानंतर सर्पमित्र महेश साळुंखे यांना बोलाविण्यात आले होते व वन विभागाला ही कळविण्यात आले. या नागाला एक तासाच्या प्रयत्नानंतर सुखरूप वाचविण्यात यश आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर