कोर्लई,ता.२७(राजीव नेवासेकर) विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन मोठे व्हावे, आपल्या कुटुंबाचे,गावाचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे व भारताचे आधारस्तंभ बनावे.शाळेत शिक्षण घेत असताना मोबाईलचा वापर अभ्यासापुरता करावा.असे प्रतिपादन लायन्स क्लब ऑफ श्रीबाग सेंटेनिअल तर्फे अलिबाग तालुक्यातील सागाव -तळवली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत आयोजित शालेय साहित्य वाटप प्रसंगी लायन्स क्लब ऑफ श्रीबाग सेंटेनिअल अध्यक्ष ॲड.डॉ.के.डी.पाटील यांनी केले.
लायन्स क्लबचे रिजनल चेअर पर्सन लायन विजय वनगे, उपाध्यक्ष लायन श्रीकांत पाटील, लायन पी.एन.पाटील, लायन जानू शिद, लायन विजय गायकवाड,लिओ लायन्स आयुष भगत, लायन सुनील राणे, लायन शैलेश घोसाळकर,अभिषेक चौधरी, स्मित भगत,अनंत वैद्य, मनोहर पाटील,अनिल पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन पाटील, उपाध्यक्षा विशाखा कवळे, सदस्या कल्याणी पाटील, मुख्याध्यापिका आराधना घरत,विनया पाटील, अनिता गोसावी, अमित सुर्वे शिक्षक वृंद, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, सरस्वती पूजन करून दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.लायन्स क्लबचे रिजनल चेअर पर्सन ऑफ लायन विजय वनगे,पी.एन.पाटील, श्रीकांत पाटील,सचीन पाटील, मुख्याध्यापिका आराधना घरत यांनी आपले विचार मांडले.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना लायन्स क्लबतर्फे दफ्तर व वह्यांचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रकाश पाटील यांनी केले तर सचिन पाटील यांनी आभार मानले.
________________________________________
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या