कोर्लई, ता.२२(राजीव नेवासेकर)मुरुड तालुक्यातील मजगांव आगरआळी येथे सप्तरंगी मित्र मंडळातर्फे साखरचौथ गणपती ची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी श्रीमुर्ती पूजेचा बहुमान महेश रामचंद्र पाके व त्यांच्या सौभाग्यवती सौ.जोत्स्ना यांना तर आरतीचा मान सागर काशिनाथ पाके यांना मिळाला.
मजगांव आगरआळीतील सप्तरंगी मित्र मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून साखरचौथ गणपती स्थापनेचे यंदा नववे वर्ष होते.
शुक्रवार दि.२० सप्टेंबर रोजी गणपती मिरवणूकीचे आगमन झाले.दुस-या दिवशी शनिवारी दि.२१सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वा.महेश रामचंद्र पाके व सौ.जोत्स्ना महेश पाके यांच्या हस्ते श्री मुर्तीची विधिवत पूजा अर्चा करून प्राण प्रतिष्ठापना व आरती करण्यात आली.
यादिवशी रात्री ९.१५ वा..कु.सागर काशिनाथ पाके यांच्या हस्ते आरती झाल्यावर भजन रात्री १०.०० वा. बुवा श्री. नरेश भेर्ले. कु. शिव महेश पाटील (विष्णू प्रासादिक भजन मंडळ दोडकुले)पखवाज अभय आयरकर, ऋषी बेडेकर यांचे सुश्राव्य बहारदार भजनाचा भाविकांनी आनंद लुटला ! रविवार दि.२२सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वा. कु. गजानन हरी भोईर व सौ.पूजा गजानन भोईर याच्या हस्ते आरती घेण्यात आली. दुपारी १२.०० वा. बुवा अजित आयरकर व बुवा महेश पाटील,(पकवाज आदित्य दर्शन मिठाग्री) यांचे सुश्राव्य भजन झाले.सायंकाळी ४.०० वा. सुरेश महादेव भोईर व सुकन्या सुरेश भोईर याच्याहस्ते उत्तर पूजा आरती घेण्यात येऊन सायंकाळी श्री मुर्तीची गावातून वाजत गाजत बेंजो च्या तालात मिरवणूक काढण्यात येऊन सांगता करण्यात आली.
सप्तरंगी मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश भोईर, उपाध्यक्ष दिपक घाग, सचिव अतिश आयरकर, सहसचिव महेश पाटील, खजिनदार अल्पेश पाटील, उपखजिनदार अरुण पाटील व सल्लागार काशिनाथ ढमाले, प्रशांत मिठाग्री,राजेंद्र पाटील व सर्व सदस्य यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
(फोटो घेणे)
________________________________________________________
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या