कोर्लई,ता.३०(राजीव नेवासेकर)मुरुड दिवाणी व फौजदारी न्यायालय (क, स्तर) व मुरुड तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायाधीश घनःश्याम तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली दि.२७ जुलै २०२४ रोजी लोकन्यायालय घेण्यात आले.
सदर लोकन्यायालयात बी. एस.एन. एल, महावितरण, बॅंक ऑफ इंडिया, मुरुड नगरपरिषद, पंचायत समिती, मुरुड न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा समावेश करण्यात आला होता. यावेळी प्री लिटिगेशन असलेली एकुण ८७९ पैकी ३२ प्रकरणे
निकाली निघाली. मुरुड नगरपरिषदेची पाणीपट्टी-घरपट्टी, पंचायत समितीची कर वसुली,तसेच बँकांची कर्ज वसुली अशी एकुण रुपये ११०४८०/- वसुल करण्यात आली.दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणांपैकी एकुण ६८ फौजदारी प्रकरणे व ०६ दिवाणी प्रकरणे निकाली काढण्यात आली. लोकन्यायालयात पंच म्हणुन ॲड.डी. एन.पाटील यांनी काम पाहिले. सहाय्यक सरकारी अभियोक्ता मिलींद साळगांवकर, ॲड.संजय जोशी, ॲड.एम.जे. तांबडकर, ॲड.हुसेन, ॲड. अजित चोगले, ॲड. कुणाल जैन,रेवदंडा पोलीस ठाण्याचे डी. डी. काकडे, मुरुड पोलीस ठाण्याचे डी. के. पाटील,सहाय्यक अधिक्षक शीला काठे, मतीन अधिकारी वरिष्ठ लिपीक व कर्मचारी वर्ग यांचे विशेष सहकार्य लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या